(School started) विद्यार्थ्यांविनाच विनाच वाजली शाळेची घंटा
नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन लागवण्यात आला. त्यात सर्व काही बंद करण्यात आले. आजापसून पासून (जि.15 जून) शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष न बोलाविता, त्यांना ऑनलाईन आणि गृहभेटीद्वारे शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. School started without students
मागील वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांन शेैक्षणिक सत्रास मुकावे लागले. यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असतांना कोरानाच्या दुस-या लाटेमुळे पुन्हा सर्व काही ठप्प झाले. सध्या कोरोनाची लाट ओसरल्याने नांदेड जिल्हा नुकताच अनलॉक करण्यात आला. यानंतर शासनाकडून मिळालेल्या सुचनेनूसार जिल्हयातील सर्व शाळा आज दि.१५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न बोलावता ऑनलाईन शिक्षण देण्याचे सुचना देण्यात आले आहे. School started without students
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तांची पाठ्य पुस्तके उपलब्ध होतील व त्यांचे ऑनलाइन माध्यमातून तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमव्दारे शिक्षण सुरु ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे आहेत विद्यार्थ्यी आणि शिक्षकनांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदे मार्फत चालविल्या जाणाऱ्या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे २४ हजार ४६८ शिक्षक तर ६ लाख ९५ हजार १२१ विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे ९ हजार २२३ शिक्षक तर २ लाख ६ हजार १६९ विद्यार्थी आहेत. School started without students
नवे शैक्षणिक वर्षच १५ जूनपासून सुरू झाले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. जिथे इंटरनेट किंवा मोबाईलचे अडचण आहे तेथे गाव पातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करावेत व कोरोनाच्या त्रिसुचीचे पालक करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. –