नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (Maharashtra State Examination Council Pune) यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी (National Economically Weaker Component Students) शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन 2021-22 ही घेतली जात आहे. ही परीक्षा उद्या रविवारी (19 जून) दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. (Scholarship scheme examination for financially weaker students tomorrow)
रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3 यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर (Examination Center) ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970, 9421293747 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. (Scholarship scheme examination for financially weaker students tomorrow)
- परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे