Scholarship Exam News। तुमचे पाल्य शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असल्यास ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्वाची..

Scholarship Exam News । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre Higher Primary Scholarship Examination) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Secondary Scholarship Examination) १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Scholarship Exam News । Extension of time for submission of applications for scholarship examination)

 

 

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 

Naib Tehsildar news। नायब तहसीलदारांनी दिला कामबंद आंदोलनाचा इशारा, काय आहे मागणी जाणून घ्या…

३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (Chairman of Examination Council Dr. Nand Kumar Bedse) यांनी कळविले आहे.

 

 

Local ad 1