IPL 2023 Schedule : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार असून, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) उद्घाटनाचा सामना होणार आहे. (The schedule of the 16th season of IPL has arrived)
आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहेत. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चे आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहे. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत. (The schedule of the 16th season of IPL has arrived)
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत. (The schedule of the 16th season of IPL has arrived)
कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने
अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला या शहरांत सामने रंगणार आहेत. (The schedule of the 16th season of IPL has arrived)