(Saturday vaccination) शनिवारी 92 केंद्रांवर होणार लसीकरण
नांदेड : जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. त्यासाठी लस सर्वत्र विभागून वितरीत करण्यात आली आहे. (Saturday vaccination)
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, सिडको व जंगमवाडी या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर देशमेश हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीनचे 150 डोस उपलब्ध केले आहेत. (Saturday vaccination)
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर व मांडवी या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 30 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत. (Saturday vaccination)