Ratnagiri ACB Trap । कामाचे बिल देण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना सरपंच-उपसरपंचाला अटक

Ratnagiri ACB Trap । रत्नागिरी : जिल्ह्यातील राजीवली (ता.संगमेश्वर) (Rajivli Sangameshwar) येथे केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचाने 40 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक च्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Sarpanch, Deputy Sarpanch arrested while accepting bribe to pay work bill)

 

Maharashtra State Excise Department। गावठी दारू विरोधात उत्पादन शुल्कची विशेष मोहिम ; तीन ठिकाणांवर नऊ आरोपींना अटक

 

सरपंच प्रशांत प्रदिप शिर्के (Sarpanch Prashant Pradeep Shirke), उप सरपंच सचिन रमेश पाटोळे (Deputy Sarpanch Sachin Ramesh Patole) (ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. (Sarpanch, Deputy Sarpanch arrested while accepting bribe to pay work bill)

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका 29 वर्षीय कंत्राटदाराने राजीवली.ता. संगमेश्वर येथे पाखाडी तयार करण्याचे काम केले आहे. केलेल्या कामांचे  बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून सरपंच प्रशांत शिर्के आणि उप सरपंच सचिन पाटोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येकी 15 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.  स्वीकारली असता रंगेहाथ अटक केली आहे.

Zilla Parishad Bharti 2023। जिल्हा परिषद नोकर भरती अभ्यासक्रमात झाला बदल ; काय ते जाणून घ्या

ला. प्र. वि., ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीक आणि पोलीस उप अधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, प्रवीण ताटे, सपोनि संदीप ओगले, पोहवा विशाल नलावडे, मपोहवा श्रेया विचारे,पोना दीपक आंबेकर, पोशि राजेश गावकर व चापोना प्रशांत कांबळे यांनी ही कामगिरी केली. (Sarpanch, Deputy Sarpanch arrested while accepting bribe to pay work bill)
Local ad 1