पटेल रुग्णालयात सायबेज आशा ट्रस्ट उभारणार शस्त्रक्रियागृह

पुणे ः सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये (Sardar Vallabhbhai patel hospital pune) सायबेजआशा ट्रस्ट (CybageAsha Trust pune) सुसज्ज शस्त्रक्रियागृह उभारणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. त्यासंदर्भात ट्रस्ट आणि पटेल रुग्णालयात सोमवारी सामंजस्य करार  (Reconciliation agreement) झाला आहे. यामुळे आता कॅन्टोन्मेंट बोर्डातील  (Pune cantonment board) गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात  (Sardar Vallabhbhai patel hospital pune) सुसज्ज असे शस्त्रक्रियागृह होते. मात्र, सप्टेंबर 2020 मध्ये लागलेल्या आगित जळून खाक झाले होते. तेंव्हापासून रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद आहेत. याचा फटका गरीब, गरजू रुग्णांना बसत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या परिसरात निम्न आर्थिक स्थर असलेल्या कुटुंबातील व्यक्ती महिलांचे आजार, हाडांच्या शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियांसाठी या हॉस्पिटलवर अवलंबून असतात. बाहेरील खासगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नाही. त्यामुळे पटेल रुग्णालय (Sardar Vallabhbhai patel hospital pune) नागरिकांसाठी आधार आहे.

 

 

सायबेज आशा ट्रस्टतर्फे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया (ऑपरेशन थेटर) पुनरुज्जीवित केले जाणार आहे. ऑपरेशन साठी लागणारे साहित्य संस्थेतर्फे देणगी स्वरूपात दिले जाईल. पुढील दोन महिन्यांत ऑपरेशन थेटर सुरू होणार असून, त्याचा फायदा गरीब नागरिकांना होणार आहे. सायबेज कंपनीच्या संचालिका रितू नथानी  (Ritu Nathani, Director, Cybage and Managing trustee) व कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार (Amit kumar, CEO, IDES, Pune Cantonment Board), निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे, डॉ.महेश दळवी, निखिल यादव उपस्थित होते.

सायबेज कंपनीचा इतिहास
सायबेज ही 1995 साली अरुण नथानी यांनी स्थापन केलेली आयटी क्षेत्रात काम करणारी प्रसिद्ध व अग्रगण्य कंपनी आहे, कंपनीत सध्या 7 हजार 400 कर्मचारी कार्यरत असून, पुणे हे कंपनीचे मुख्य केंद्र व गांधीनगर व हैद्राबाद ही उपकेंद्रे आहेत.

Local ad 1