(Pilot project) मराठवाड्यातील तरुणांसाठी औरंगाबादेत होणार ‘सारथी’चा ‘पायलट प्रोजेक्ट’
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी आणि औद्योगिकरणामुळे जागाच्या नकाशावर असलेल्या औरंगाबाद येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे ओद्योगिक क्षेत्रासाठी प्रशिक्षित रोजगार उपलब्ध होणार आहे. मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट राबवण्याचे नियोजन असल्याचे, संस्थेचे संचालक उमाकांत दांगट यांनी सांगितले. Sarathi’s pilot project to be held in Aurangabad for Marathwada youth
जिल्हाधिकारी कार्यालयात सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत दांगट बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कौशल्य विकासचे बी. एन. सुर्यवंशी यांच्यासह उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमण आजगावकर, प्रसाद कोकील, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड उपस्थित होते. Sarathi’s pilot project to be held in Aurangabad for Marathwada youth
कोकाटे यांनी पारंपारिक ते अद्यावत रोजगाराला पूरक असलेल्या विविध प्रशिक्षणाची नवतरूणांना गरज आहे. त्यादृष्टीने सारथीच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचे असून यामध्ये प्रथम प्राधान्याने उद्योग क्षेत्राशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव करावयाचा आहे. त्यादृष्टीने उद्योजकांनी संकल्पना सादर करावी. या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना कौशल्य, कौशल्यवृद्धी आणि कौशल्य अद्यावत करणे या पद्धतीने करावी. जेणे करून प्रशिक्षणार्थीला अद्यावत ज्ञानासह टिकून राहण्यास सहाय्य मिळेल. -मधुकर कोकाटे, संचालक, सारथी