नांदेड : वाळू उपश्याचे लिलिव झालेले नाही. मात्र. नदीपात्रालगत किंवा इतर ठिकाणी वाळूची साठेबाजी केली जात आहे. ज्यांच्या शेतात वाळूचे साठे आहेत,त्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी, अन्यथा जमिन मालकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या दंडात्मक रक्कामेचा बोझा संबंधीताच्या जमिनीवर घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे. (Sand stocks)
जिल्ह्यातील जप्त रेतीसाठ्यांच्या लिलावाच्या अनुषंगाने करावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लिलाव झालेला नसून कोणी जर नदीपात्रालगतच्याा शेतीमध्ये मोठया प्रमाणात अवैध रेतीसाठे करीत असतील तर त्यांच्या कठोर कारवाई करू, केली जाणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे. (Sand stocks)
जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्या शेतजमिनीत किंवा इतर ठिकाणी शेतीजमिनी तसेच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी अवैध रेतीसाठे कुणाला आढळल्यास अशा शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीत केलेल्याा अवैध रेतीसाठयाची माहिती संबंधीत कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ कळवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे.लिलाव झालेला नसताना सुध्दा बांधकामाच्या ठिकाणी रेती उपलब्ध होत असल्याने ही रेती अवैध उत्खनन व वाहतुकीद्वारे उपलब्ध होत असल्याची शक्यता आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात बांधकामाच्या ठिकाणी रेतीसाठे आढळुन येत आहे. (Sand stocks)