(Sand mafia threatens journalists) वाळू माफियाची पत्रकारा्ंना धमकी

कंधार  : तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची बेकायदा वाहतूक केली जात असून, त्याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळू माफियानी वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरुन  पत्रकार संघाचे अध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. (Sand mafia threatens journalists)

याप्रकरणात आरोपिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाळू माफियावर कठोर कारवाई करा, अशी मागणी  करत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. (Sand mafia threatens journalists)

मंगळवारी (दि.१६) रोजी सत्यनारायण मानसपुरे आणि पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण हे दोघे चारचाकी वाहनाने लोहा येथून कंधार कडे येत असतांना त्यांच्या गाडीस साईड न देता धुरळा उडवीत जात असलेल्या वाळूच्या गाडीस जाब विचारल्या नंतर मानसपुरे व चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी वाळू माफिया कडून देण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला.  (Sand mafia threatens journalists)

या घटनेचा कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने  निषेध करून गत कित्येक वर्षां पासून तालुक्यात बिनधिक पणे सुरू असलेली अवैध वाहतुक बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या कडे करण्यात आली.(Sand mafia threatens journalists)

निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गायकवाड, तालुकाध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे, सचिव योगेंद्रसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष दयानंद कदम, हाफिज घडीवाला, महंमद अनसरोद्दीन, एन.डी. जाभाडे, राजेश पावडे, विठ्ठल कत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (Sand mafia threatens journalists)

.

Sand mafia threatens journalists
https://www.mhtimes.in/preparations-for-election-of-vacant-posts/

Local ad 1