...

 राज्यसभा निवडणूक : संभाजीराजे छत्रपती यांनी केली मोठी घोषणा

Sambhajiraje chhatrapati : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha elections) रिंगणात उतरणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती.  त्याविषयी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्यात मोठी घोषणा केली आहे. (Rajya Sabha Election: Sambhajiraje Chhatrapati made a big announcement)

 

मोठी बातमी : म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, घराचे स्वप्न स्वप्नच राहणार !

 मुंबईत पत्रकार परिषद घेत संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. “छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान” आहे, असे सांभीजीराजे छत्रपती  यांनी सांगितले आहे.
Local ad 1