साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. बबन जोगदंड
पुणे : लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. (Sahitya Sammelan as the conference president.Dr. Baban Jogdand)
बुद्ध, कबीर, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा मानवतावादी विचार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गीतरचनेतून आणि पहाडी आवाजात गाऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे महान आंबेडकरी जलसा कार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे २०२१ -२०२२ हे शताब्दी वर्ष आहे .या ऐतिहासिक संदर्भाने वामनदादांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याच्या उद्देशाने सत्यशोधक फाउंडेशन व मानव विकास सेवाभावी संशोधन संस्था नांदेडच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
Related Posts
डॉ.बबन जोगदंड यांची यांचे सामाजिक,साहित्यिक चळवळीत भरीव योगदान असून त्यांची दहाहुन अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर ते जवळचे भाष्यकार आहेत. शिवाय ते रेकॉर्डब्रेक पदवीधारक आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन ही निवड केल्याचे संयोजकांनी सांगितले. (Sahitya Sammelan as the conference president. Dr. Baban Jogdand)