...

मराठवाड्याचा केसर आंबा पोहोचणार जागतिक पातळीवर

औरंगाबाद Marathwada News : हापूस आंबा म्हंटल की, कोकण आठवत. परंतु गेल्या काही वर्षांत दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्याने ही ओळख पुसून काढण्याचा प्रयत्न करत आहे. (Saffron Mango from Marathwada is now a Postage stamp)  

 

मराठवाडा आता केसर आंबा उत्पादनासाठी ओळखले जाऊ लागला आहे. केसर आंब्याला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) मराठवाडा केसर आंब्याला “मराठवाडा केसर आंबा” असा भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल टॅग) दिले आहे. तसेच जागतिक स्तरावर प्रसिध्दी मिळावी यासाठी टपाल तिकीटावर केशर आंब्याला स्थान दिले आहे. (Saffron Mango from Marathwada is now a Postage stamp)  

 

 

केसर आंबा असलेले टपाल तिकिटाचे  अनावरण पोस्टमास्टर जनरल व्ही. एस. जयासंकर (Postmaster General VS Jayasankar) यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector of Aurangabad Sunil Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल.

 

या प्रसंगी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, एम. बी. पाटील, विजय अण्णा बोराडे, प्रवर अधिक्षक डाकघर जी. हरिप्रसाद, आर.डी.कुलकर्णी, हेमंत खडकेकर, संजय ताठे, मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रसंगी व्ही. एस. जयासंकर, सुनील चव्हाण, डॉ.तुकाराम मोटे, एम.बी.पाटील, विजय अण्णा बोराडे आदींनी विचार मांडले. त्यांनी मराठवाडा केसर आंब्याचे जास्तीत जास्त क्षेत्र व निर्यात आदी बाबींवर प्रकाश टाकला. आभार श्याम नीळकंठ यांनी मानले.

 

सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी भारतीय डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी टपाल तिकीट छंद जोपासणाऱ्या व्यक्तींची उस्‍फूर्त उपस्थिती होती.

 

 

Local ad 1