...

आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी जाहीर होणार

पुणे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती पालकांना मेसेजद्वारे १४ फेब्रुवारीपासून पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर सक्त कारवाई करण्यात येणार असून, त्याची माहिती शिक्षण विभागाला कळविण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Education Commissioner Sachindra Pratap Singh) यांनी केले आहे. (The draw for the RTE online admission process will be announced on Monday.)

 


आरटीई प्रवेशाची ऑनलाइन सोडत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या (एससीईआरटी) कार्यालयात शिक्षण विभागाचे अधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. आरटीई ऑनलाइन सोडतीसाठी नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्यांद्वारे क्रमांक काढले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधक परिषदेचे संचालक राहुल रेखावार, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

 

  • आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. यंदा शाळा कमी झाल्या असल्या, तरी प्रवेश क्षमतेत पाच हजारांनी वाढ झाली आहे. ऑनलाइन सोडतीची माहिती आता राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) कार्यालयाला पाठविण्यात आली असून, त्याआधारे एनआयसीकडून मुलांच्या प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाचा प्रवेश जाहीर झाला असल्यास, त्याची माहिती पालकाला अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज द्वारे देण्यात येईल, अशी माहिती गोसावी यांनी दिली. आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना चांगल्या शाळांमध्ये उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे, यासाठी राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातून अधिकाधिक मुलांना शिक्षणाची संधी मिळेल आणि शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देतील, अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली.

    आरटीई प्रवेश प्रक्रियेची माहिती

  • शाळा – ८८६३
  • जागा – १०९०८७
  • अर्जांची संख्या – ३०५१५९
  • पुणे जिल्ह्यातील शाळांची संख्या – ९६०
  • प्रवेशक्षमता – १८४९८
  • प्रवेश अर्ज – ६१५७३

 

 

 

खासगी शाळांनी मुलांचे प्रवेश नाकारल्यास, संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरटई प्रवेशाचे प्रलोभन दाखविणाऱ्या एजंटांवरही नियमाने कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पालकांनी पुढे येत, संबंधित शाळा किंवा व्यक्तींची माहिती शिक्षण विभागाला द्यावी.
सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त

 

 

पोतदार शाळेसाठी सर्वाधिक अर्ज
राज्यात सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यात आले आहेत. या अर्जांची संख्या ६१ हजार ६७३ एवढी आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वाधिक अर्ज हे कात्रज येथील पोदार शाळेसाठी आले आहेत. या शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी ७१ जागा उपलब्ध असून, त्यासाठी तीन हजार ३७६ अर्ज आले आहेत, अशी माहिती गोसावी यांनी दिली. गेल्या वर्षीही पोदार शाळेसाठी सर्वाधिक अर्ज आले होते.

Local ad 1