...

RTE admission process । आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार ?

RTE admission process । गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षण हक्क कायद्या आहे. त्याअंतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यात शाळेचे शुल्क शासन अदा करत असतो. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना चांगल्या शाळामध्ये मोफत शिक्षण मिळत असते. दर वर्षी प्रवेश प्रक्रिया जानेवारी मध्ये सुरु होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (Academic year 2025-26) साठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act) २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे २३०० शाळांनी नोंदणी केली असून, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. (RTE admission process will begin)