...

Rshan Dukan News Update In Marathi। रेशन दुकानात मिळणार आता बँकिंग सुविधा !

ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बँकेच्या सेवा-सुविधा मिळण्यासाठी रेशन दुकानांमधून बँकेच्या सेवा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Rshan Dukan News Update In Marathi । ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बँकेच्या सेवा-सुविधा मिळण्यासाठी रेशन दुकानांमधून बँकेच्या सेवा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंटस बँक आणि खासगी बँकांच्या सेवा (Services of nationalized banks, India Post Payments Bank and private banks)आता रेशन दुकानांमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाने (Central and State Govt) व रेशन दुकानदार संघटनांशी चर्चा करुन विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

 

बँकेच्या सेवा रेशन दुकानदारांस बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्यास रेशन दुकानदारांना व्यवसायाचे नवीन मार्ग उपलब्ध होणार आहेत. रेशन दुकानांचे जाळे राज्यात सर्वदूर पसरलेले असून, रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. दुकानदार आर्थिकदृष्टया सक्षम होऊन त्यांच्या दैनंदिन कामकाजात स्थैर्य येईल. रेशन दुकानांमधून सर्वसामान्य जनतेला अनेक सेवा पुरविण्यात येत असून, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

 

रेशन दुकानदारांना ऐच्छिक

रेशन दुकानांतून बँकिंग सेवा पुरविण्याच्या उपक्रमात दुकानदारांना ऐच्छिक आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे, ते होऊ शकतात. संबंधित बँक आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये लेखी करार केला जाणार आहे. ग्रामीण भागासाठी चांगला निर्णय सामान्य लोकांसाठी विशेषत: दुर्गम भागातसुद्धा बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात अजूनही बँका पोहोचल्या नाहीत. बँकेत येण्यासाठी नागरिकांना 10 ते 15 किलोमीटरपर्यंत यावे लागते. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या गावातच रेशन दुकानांमध्ये बँकेच्या सेवा मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

 

 

काय मिळेल रेशन दुकानांतून

शासनाच्या या निर्णयामुळे रेशन दुकानांमधून पैसे जमा करणे, पैसे काढणे, बिल भरणे याचसह आरटीजीएस आदी सुविधा नागरिकांना मिळणार आहे. तसेच बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या सहयोगाने ग्राहकास कर्ज सुविधा उपलब्ध होतील. कॅशलेस आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून सर्व व्यवहार सुलभ, जलद आणि सुरक्षितपणे करता येणार आहेत.

Local ad 1