RSF Fitness Club आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात
अभिनेता, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते उद्घाटन
RSF Fitness Club । जिम इक्विपमेंट मध्ये भारतासह परदेशातही नावाजलेला आर एस एफ ब्रॅंड आता फिटनेस क्लब व्यवसायात उतरला आहे. आर एस एफच्या देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या फिटनेस क्लबचे उद्घाटन पुण्यातील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग (Bodybuilder Thakur Anup Singh) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर.एस.एफ चे संचालक पुनीत जैन (RSF Director Puneet Jain), सोनू जैन, आदित्य जैन आदी मान्यवर उपस्थित होते. (RSF Fitness Club now in Pune)
पुनीत जैन म्हणाले, आर एस एफ ब्रँडची जिम इक्विपमेंट प्रसिद्ध असून, या क्षेत्रात आम्ही मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहोत. २ हजार ८०० हून अधिक जीम मध्ये आमची उत्पादने वापरली जातात. आता आम्ही प्रत्यक्ष जीम उभारून एक नवीन पाऊल टाकले आहे. चंदीगड येथे आमची पहिली जीम सुरू करण्यात आली आहे, चंदीगड आणि पुण्यातील ही जीम डायरेक्ट कंपनीच्या मालकीच्या असून, आम्ही या व्यवसायात फ्रॅच्यायसी सुरू करणार आहोत. त्यासाठीही पुण्यातील हा आमचा फिटनेस क्लब मॉडेल आहे. या फिटनेस क्लब मध्ये फक्त फिटनेसचे धडे मिळणार नाहीत तर त्या पलीकडे जाऊन ‘फिट इंडिया’ (Fit India) मोहीम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जीम मध्ये असलेल्या ट्रेनर्सचे ट्रेनिंग, त्यांना सर्टिफिकेट कोर्स आम्ही ‘आर एस एफ ट्रेनिंग सेंटर’ या माध्यमातून सुरू करत आहोत, (RSF Fitness Club now in Pune)
अनुप सिंग म्हणाले, तुम्हाला फिट राहायचे असेल तर जीम करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि त्याला प्रोटिनयुक्त पौष्टिक आहाराची जोड असेल तरच आपण फिट राहू शकतो ही बाब लक्षात ठेवा कारण जीम केली आणि आपले डायट व्यवस्थित नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. दैनंदिन कामाच्या व्यसतेमुळे आपल्या आहारात सर्व आवश्यक घटकांचा समावेश नसतो. यामुळे सप्लीमेन्ट गरजेचे असतात असेही ठाकूर अनुप सिंग यांनी नमूद केले. (RSF Fitness Club now in Pune)