Roof top hotels in Pune । पुण्यातील रुफ टॉप हॉटेल्स प्रशासनाच्या रडारावर

Roof top hotels in Pune । पुण्यातील विविध भागात रुफ टॉप हॉटेल्सचे (Roof top hotels in Pune) पेव फुटले असून, त्याचा त्रास रात्रीच्या वेळी रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्यानंतर आता प्रशासन जागे झाला आहे. जिल्हाधिकारी (Collector) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली  होती, त्या समितीच्या रडारावर रुफ टॉप हॉटेल्स ( Roof top hotels in Pune ) आले आहेत. प्रशासनाने शहरातील 26 रुफ टॉप हॉटेल्स (Roof top hotels in Pune) चालकांना नोटीस बजावली आहे. (Roof top hotels in Pune are on the administration is radar)

 

 

गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत रुफ टॉप हॉटेल्सवर (Rooftop hotel) उत्पादन शुल्क विभागाकडून केली जात आहे.  गेल्या काही महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणार्‍या 21 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करुन या हॉटेल्सच्या मालकांकडून 6 लाख रुपयांचा दंडही वसूल ही करण्यात आले होते.  त्यानंतर आता नव्याने 26 रुफ टॉप हॉटेल्स (Rooftop hotel) चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

उत्पादन शुल्क विभागाने (Pune Excise Department) दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत हॉटेल्सना जास्त दंड आकारण्यात आला आहे. एका वर्षात एकूण 29 रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुण्यातील रुफटॉप हॉटेल्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.

 

पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील अनेक रूफटॉप हॉटेलचे बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी (Mahamadwadi, Kalyaninagar, Yerawada, Koregaon Park, Baner, Pashan, Kothrud, Kharadi) आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या. आता पुन्हा 26 रुफ टॉप हॉटेल्स (Rooftop hotel) चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

पुण्यात रात्री उशीरापर्यंत रुफ टॉप हॉटेल्स (Rooftop hotel) सुरु असतात. विशेष म्हणजे अनेक तरुणांचा सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या आहेत.

 

Local ad 1