...

Ring Road Of PMRDA । पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी हवी 47 हेक्टर वन जमीन ; रिंगरोडची रुंदी किती माहित आहे का ?

Ring Road Of PMRDA : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासठी दोन रिंगरोड केले जात आहेत. त्यात एक पुणे महानगर विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Development Authority (PMRDA) आणि दुसरा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Maharashtra State Road Development Corporation) बांधणार आहे. दोन्ही रिंगरोडसाठी भूसंपादन आणि प्रशासकीय कामकाज सुरु आहे. परंतु पीएमआरडीएला आपल्या रिंगरोडसाठी वनविभागाची 47 हेक्टर जमीन हवी आहे. त्यासाठी पीएमआरडीएने प्रस्ताव ऑनलाईन पाठवलं आहे. (47 hectare forest land required for ring road of PMRDA)    

पीएमआरडीएच्या हद्दीतील 110 मी. रुंद रिंगरोडच्या 128.08 कि.मी. लांबी पैकी परंदवाडी ता. मावळ ते सोळू ता.खेड ही 40 कि.मी. लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विकसनासाठी हस्तांतर करण्यात आला आहे. तर उर्वरित लांबीसाठी रस्त्याची रुंदी 65 मी. करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यांस अनुसरून महाराष्ट्र शासनाची नगररचना अधिनियमानुसार कलम 20 (3) ची अधिसुचना दि.18/11/2021 रोजी प्रसिद्ध झाली असुन, पुढील कार्यवाही नगर रचना विभाग पुणे मार्फत सुरु आहे. त्याप्रमाणे प्राधिकरणाच्या ऑगस्ट 2021 मधील प्रसिद्ध प्रारुप विकास आराखड्यात प्राधिकरणाकडील रिंग रोडची रुंदी 65 मीटर दर्शविण्यात आली आहे. (47 hectare forest land required for ring road of PMRDA)

 

 

 

65 मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यासाठी सोलू, निरगुडी व वडगांव शिंदे या तीन गावांचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. तथापि 65 मी. रुंदीच्या संपुर्ण 88.08 कि.मीच्या रिंगरोड साठी आवश्यक 47 हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाच्या परिवेष या पोर्टलवर दि.31/05/2023 रोजी अपलोड करण्यात आला असून प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचेकडे दि.02/06/2023 रोजी सादर करण्यात आला. (47 hectare forest land required for ring road of PMRDA)

 

           संपादित करावयाच्या सुमारे ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असुन पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झालेवर वनविभागासाठी चर्चा करुन पर्यायी जागा देण्यात येईल. (47 hectare forest land required for ring road of PMRDA)
Local ad 1