पुण्यातील रिक्षाचलकाच्या मुलाने ’नीट’मध्ये मिळवले 607 गुण ; डॉक्टरकीचे स्वप्न होणार पूर्ण !

पुणे : वडील रिक्षाचालक… आई अंगणवाडी सेविका… मनाशी डॉक्टर होण्याची जिद्द… वर्षभर घेतलेले कठोर परिश्रम केले. तर डॉ. अभंग प्रभू यांचे मिळालेले मार्गदर्शनामुळे एमबीबीएसला प्रवेश मिळवण्याचे पूर्ण झाले आहे. आता पुढील शिक्षणासाठी अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीची (Abhang Prabhu Medical Academy) साथ मिळाली आहे. (Rickshaw puller’s son scores 607 in NEET; The dream of becoming a doctor will come true!)

 

 

रिक्षाचालकांचा मुलगा असलेल्या राज गजानन दामधर (Raj Gajanan Damdhar) असे डॉक्टर होणार्‍या मुलाचे नाव आहे.

 

अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचे (एपीएमए) संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध प्रसूतिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अभंग प्रभू यांनी वर्षभरापूर्वी राज दामधर याची आर्थिक परिस्थिती समजून घेत त्याला एका अटीवर प्रवेश दिला. 50 हजारांची अनामत रक्कम ठेवायची आणि सचोटीने अभ्यास करून ’नीट’ परीक्षेत 600 पेक्षा अधिक गुण मिळवून ती रक्कम परत मिळवायची अशी ती अट होती. राजने डॉ. प्रभूंचा विश्वास सार्थ ठरवत ’नीट’ परीक्षेत 607 गुण मिळवले.

 

डॉ. प्रभू यांनी ठरल्याप्रमाणे अनामत रकमेचा धनादेश परत करण्यासह त्याचे एमबीबीएसचे चार ही वर्षांचे शुल्क भरण्याचे ठरवले. त्याचा धनादेश त्यांनी शुक्रवारी राज व त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केला. तसेच राज यांच्यासह अकॅडमीतील अन्य 20 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी त्याचे वडील गजानन दामधर, आई प्रमिला दामधर, ’एपीएमए’चे संचालक प्रा. सचिन हळदवणेकर, संचालिका डॉ. हिमानी तपस्वी, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी, डॉ. राजेश देशपांडे (APMA Director Prof. Sachin Haldwanekar, Director Dr. Himani Tapaswi, Counselor Dr. Sheetal Srigiri, Dr. Rajesh Deshpande) आदी उपस्थित होते. प्रसंगी डॉ. प्रभू यांनी यावर्षीपासून तीन गरीब व गरजू मुलींना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.

 

 

डॉ. अभंग प्रभू म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून ’एपीएमए’ डॉक्टर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. मुंबई, सांगली आणि पुण्यात ’एपीएमए’ कार्यरत आहे. पुणे शाखेत जवळपास 750 विद्यार्थी ’नीट’ परीक्षेसाठी मार्गदर्शन घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरकी करणारे, तसेच तज्ज्ञ शिक्षक येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एमबीबीएसला पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण ही ’एपीएमए’ची खासियत आहे. राज यांच्याप्रमाणेच गरीब व गरजू मुलींना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी यंदा तीन मुलींच्या एमबीबीएसची फी ’एपीएमए’ भरणार आहे.

 

 

राज म्हणाला, माझे मुळगाव बुलढाणा येथील संग्रामपूर आहे. वडिलांचे बीएस्सी, तर आईचे 12 वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोठ्या भावाने डीफार्मसी केले आहे. मात्र, नोकरी नाही. पुण्यात आंबेगाव पठार येथे राहत असून, वडील गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. आई खासगी अंगणवाडी सेविका आहे. गेल्या वर्षी आर्थिक परिस्थितीमुळे गावी क्लासेस लावले व मेहनत केली. पण थोडक्या मार्कांवरून एमबीबीएस हुकले. ’नीट’ पुन्हा देण्यासाठी व तयारीसाठी ’एपीएमए’कडे आलो. इथली फी माझ्या आवाक्याबाहेर होती. त्यावेळी डॉ. प्रभू सरांना माझी आर्थिक परिस्थिती सांगितली. सरांनी माणुसकीच्या जाणिवेतून मला सहकार्य केले. फी न भरता मला वर्षभर क्लासेस करता आले. उत्तम मार्गदर्शन व अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर मला 607 गुण मिळाले.

 

डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, डॉक्टर होण्याची जिद्ध उराशी बाळगून, मेहनतीने व आम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार चांगला अभ्यास करत वैद्यकीय प्रवेश मिळवणार्‍या राजची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नैराश्याने ग्रासलेल्या, आई-वडिलांकडून सगळ्या गोष्टी मिळूनही एकाकी झालेल्या मुलांना राजप्रमाणे मेहनतीने यश मिळवायला हवे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र मुलींकडून अर्ज मागविण्यात येणार असून, त्यातून तीन मुलींची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी apmapuneco@gmail.com या ईमेलवर किंवा ८५९१५०२२९१ व ९८२२३७८५०५ या मोबाईलवर संपर्क करावा, असे डॉ. अभंग प्रभू यांनी सांगितले.
Local ad 1