दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नांदेड । प्रतिनिधी
शेत जमीन वारसा हक्काप्रमाणे मुलाच्या व इतरांच्या नावावर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) 4 फेब्रुवारी तक्रार केली होती. 5 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली, असता त्यात लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Revenue officials demanded a bribe of Rs 2,000)
Bharat Ratna Lata Mangeshkar passes away भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
महसूल विभागातील सरकारी बाबू एसीबीच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंडळ अधिकारी मारुती किशनराव मेखाले (वय -57) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोर मंडळअधिकाऱ्यांचे नाव आहे. (Revenue officials demanded a bribe of Rs 2,000)
स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लाचखोर मेखाले हा मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांना वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन वारसा हक्का प्रमाणे व इतरांच्या नावावर फेरफार करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी चार फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Revenue officials demanded a bribe of Rs 2,000)
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद हिंगोले, एकनाथ गंगातीर्थ, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर, आकाश गायकवाड, मारुती सोनटक्के यांनी केली. (Revenue officials demanded a bribe of Rs 2,000)
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.