मुंबई : पुणे विभागाचे महसूल अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve, Leader of the Opposition in the Legislative Council) यांनी मोठा खुलासा केला आहे. एक पत्र ट्वीट करून व्वा रे वा विखे पाटील असे लिहिले आहे. (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil had recommended to Chief Minister Eknath Shinde not to transfer Anil Ramod)
व्वा रे व्वा विखे पाटील!
पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र… pic.twitter.com/SKebYp0m69
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 25, 2023
व्वा रे व्वा विखे पाटील !
पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे. या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करू नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते,’ असा दावा करत दानवे यांनी विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.