Revenue department। महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जानेवारीत होणार !
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महसूल विभागातील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
Revenue department मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024) पार्श्वभूमिवर महसूल विभागातील जिल्हाधिकारी (Collector) व जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer), उप जिल्हा निवडणूक अधिकारी (Deputy District Election Office), निवडणूक निर्णय अधिकारी (Election Decision Officer) व त्यांचे सहाय्यक अधिकारी, प्रांत (Deputy Divisional Officer), तहसीलदारांच्या (Tehsildar) बदल्यांचे आदेश जानेवारी महिन्यात निघण्याची शक्यता आहे. ज्या अधिकाऱ्यांना एका विभागात तीन वर्षे झाली आहेत, किंवा एक जिल्ह्यात चार वर्षे सेवा झाली आहे, त्यांच्या बदलीचे आदेश निघणार आहेत. (Revenue department officials will be transferred in January!)
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३० जून २०२४ पर्यंत मागील ४ वर्षांपैकी ३ वर्ष एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश भारत निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे वर्षांनुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे निश्चित झाले आहे.
निवडणुका पारदर्शी होण्यासाठी मागील ४ वर्षात एकाच जिल्ह्यात ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत. अशा अधिकाऱ्यांंच्या बदलीची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२४ पर्यंत म्हणजेच अवघ्या महिन्यात पूर्ण करा, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या जागा आणि बदल्यांमुळे रिक्त होणाऱ्या जागांचा शोध अधिकारी घेत असल्याची चर्चा अधिकारी वर्गात आहे.
चहापेक्षी कॅटली गरम…
आपल्या सोयीची आणि क्रिम पोस्ट मिळविण्यासाठी महसूल विभागातील इच्छुकांनी अधिकारी संभाव्य जागेवर ‘फिल्डींग’ लावण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांना मंत्री मोहदयांचा मुड ठिक नाही… नंतर भेटा…साहेब मिटींगमध्ये आहेत, तुमच काय काम आहे, ते आधी सांगा, अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना चहापेक्षा कॅटली गरम असल्याचा अनुभव येत असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले.