Results। प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर

Results । पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced) जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त एच. आय. आतार (State Examination Council Commissioner H. I. Atar) यांनी दिली.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Upper Primary Scholarship Examination)  (इ. ५ वी) परीक्षेसाठी एकूण 3 लाख 88 हजार 515 नोंदविलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 37 हजार 370 विद्यार्थी उपस्थित होते. तर 37 हजार 871 विद्यार्थी अनुपस्थित होते. 57 हजार 334 पात्र विद्यार्थी आहेत. तर 14 हजार 250 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक  जाहीर झाली आहे. पात्र विद्यार्थी संख्येनुसार 16.9944 टक्के निकाल आहे. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Secondary Scholarship Examination) (इ. ८ वी) परीक्षेसाठी एकूण 2 लाख 44 हजार 314 नोंदविलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 10 हजार 338 विद्यार्थी उपस्थित होते. तर 22 हजार 814 विद्यार्थी अनुपस्थित होते. 23 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले. तर 10 हजार 736 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. पात्र विद्यार्थी संख्येनुसार 11.3921 टक्के निकाल आहे. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत गुणपडताळणीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले. परिषदेकडे विहीत मुदतीत ऑनलाईन आलेल्या परिपूर्ण अर्जावरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करून गुणपडताळणी अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून (शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी) तयार करण्यात आली आहे.

www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास बैठक क्रमांक टाकून पाहता येईल. शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced)

 

असा मिळेल निकाल

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहिती संकेतस्थळावरील अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी), गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय), शाळा सांख्यिकीय माहिती जिल्हानिहाय / तालुकानिहाय) या लिंकवर क्लिक करुन विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे.

त्यांचा निकाल जाहीर नाही…
शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी, मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी तसेच विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधीक वयाचे विद्यार्थी, परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी, आवेदन न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी यांचा गुणवत्ता यादीत समावेश नाही.

परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम गुणपत्रक उपलब्ध आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहेत. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced)

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रद्द प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced)

ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, तसेच अशा विद्यार्थ्यांची अर्हता रद्द करण्यात येणार आहे असेही कळवण्यात आले आहे. (Results of Primary and Secondary Scholarship Examination Announced)

Local ad 1