Restrictions । निवडणूक जाहीर होताच ‘हे’ येतात निर्बंध..!

देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जाणून घेऊया...

Restrictions । नांदेड  : निवडणूक कोणतीही असो, या दरम्यानच्या काळात अनेक निर्बंध लावले जातात. नेमके काय असतात हे निर्बंध उदारणादाखल देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जाणून घेऊया. भारत निवडणूक आयोगाकडून  (Election Commission of India) 90-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची (90-Deglaur Assembly by-election) घोषणा केली असून, आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. (The standard code of conduct has been implemented.) पोट निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्या्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (District Magistrate Dr. Vipin Itankar)  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये (Section 144 of the Code of Criminal Procedure 1973)  अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध जारी केले आहेत. (Read the restrictions that come as soon as the election is announced)

ध्वटनीक्षेपक, ध्वीनिवर्धकाचा वापर…

       कोणतीही व्यंक्ती , संस्था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वंनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.

 

 

वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक कोण लावू शकतो..

निवडणूकीच्या कालावधीत कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरता येत नाहीत. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनावर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हायध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यततिरीक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही. (Read the restrictions that come as soon as the election is announced)

 

 

 

शासकीय विश्रामगृह वापरावर निर्बंध

शासकीय व निवडणूकीच्या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतीरिक्त 2, इतर कोणत्याही व्यक्तीस विश्रामगृहात थांबण्यासाठी संबंधित खात्यानने दिलेला अधिकृत परवाना असल्याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्या परिसरात प्रवेश करता येणार नाही.

 

 

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्थाापन करण्यास निर्बंध

निवडणूकीच्या कालावधीत धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करणे. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्यारत आले आहे.

 

 

शस्त्रे वाहून नेण्यावर बंदी

निवडणूकीच्या कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँक सुरक्षा गार्ड यांच्या व्यातिरिक्त इतर सर्व परवान्यायतील शस्त्रे वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

नामनिर्देशनपत्र दाखल करताना करण्याची कार्यपद्धत

निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याा कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहनाना तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच पेक्षा जास्त व्याक्तींना, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात मिरवणूक / सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचारास  प्रतिबंधीत करण्यारत आले आहे. (Read the restrictions that come as soon as the election is announced)

 

 

मतदान केंद्र परिसरात 144 कलम

मतदानाच्या दिवशी शनिवार (30 आक्टोंबर) सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु राहील. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आले आहे. (Read the restrictions that come as soon as the election is announced)

 

 

 

 

Web title : Read the restrictions that come as soon as the election is announced

 

 

Local ad 1