पुण्यात बांधकाम, रस्त्यावरील धूळ देतेय श्वसनविकारांना निमंत्रण !
पुणे : शहरात कामावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या समीर (नाव बदललेले) सतत शिंक येणे, सर्दी, खोकल्याचा त्रास सतत व्हायचा. आधी फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेतल्याने फारसा फरक पडला नाही. मग, त्याला श्वसनविकारतज्ज्ञाकडे (Respiratory specialist) पाठवले असता त्याची लक्षणे व कामाचे स्वरूप पाहता हा त्रास हा धुळीमुळे होत असल्याचे निदान झाले. औषधे दिली व मास्क वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याचा त्रास कमी झाला. सध्या ज्यांचा प्रवास जास्त आहे, धुळीचा ज्यांना सामना करावा लागतो त्यांच्याबाबत श्वसनयंत्रणांचा त्रास वाढल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ सांगतात. (Respiratory problems are increasing due to construction and road dust)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed