...

पुण्यात बांधकाम, रस्त्यावरील धूळ देतेय श्‍वसनविकारांना निमंत्रण !

ॲलर्जीसह, फु‍प्‍फुसविकार, खोकला, दम्‍याचे रुग्‍ण वाढले

पुणे : शहरात कामावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या समीर (नाव बदललेले) सतत शिंक येणे, सर्दी, खोकल्‍याचा त्रास सतत व्‍हायचा. आधी फॅमिली डॉक्‍टरांकडे उपचार घेतल्‍याने फारसा फरक पडला नाही. मग, त्‍याला श्‍वसनविकारतज्‍ज्ञाकडे (Respiratory specialist) पाठवले असता त्‍याची लक्षणे व कामाचे स्‍वरूप पाहता हा त्रास हा धुळीमुळे होत असल्‍याचे निदान झाले. औषधे दिली व मास्‍क वापरण्‍याचा सल्‍ला दिल्‍यानंतर त्‍याचा त्रास कमी झाला. सध्‍या ज्‍यांचा प्रवास जास्‍त आहे, धुळीचा ज्‍यांना सामना करावा लागतो त्‍यांच्‍याबाबत श्‍वसनयंत्रणांचा त्रास वाढल्‍याचे श्‍वसनविकारतज्‍ज्ञ सांगतात. (Respiratory problems are increasing due to construction and road dust)

 

 

पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष होणार मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर

 

 

 
     सूरू असलेले बांधकामे, रस्‍त्‍याचे कामे, पदपथ नसलेले रस्‍ते व एकंदरीतच सर्वच ठिकाणी धुलिकणांचा प्रादुर्भाव वाढल्‍याने नागरिकांना श्‍वसनविकारांचा त्रास वाढला आहे. त्‍यामध्‍ये ॲलर्जीयुक्‍त सर्दी, खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ, त्‍वचा काळवंडणे अशा समस्‍या रुग्णांमध्ये वाढलेल्‍या दिसून येत आहेत. त्‍याचे प्रमुख कारण हे शहरातील वायु प्रदूषण, धुलिकण हे मोठया प्रमाणात कारणीभूत असल्‍याचे तज्‍ज्ञ सांगतात. 

 

 

नागरिकांमधील जनजागृती वाढायला हवी

 रस्‍ता, बांधकामांच्‍या धुळीमुळे तसेच सुक्ष्‍म धुलिकणांमुळे रुग्‍णांमध्‍ये ‘सीओपीडी’ (काळा दमा), दमा, साधा खोकला, ॲलर्जी, अतिसंवेदनशील श्‍वसनविकार, फुप्‍फुसविकार हे आजार रुग्‍णांमध्‍ये दिसून येत आहेत. खासकरून ज्यांना आधीपासूनच दम्‍याचा त्रास आहे त्‍यांच्‍यामध्‍ये दमा व इतर आजारांची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे. पूर्वी फक्‍त धूम्रपान केल्‍याने, गाड्यांमधील धुरामुळे दमा होत असल्याचे सांगितले जात असे परंतु, अलीकडे भारत, युरोप, आफ्रिका येथे झालेल्‍या संशोधनानुसार धुळीमुळेही दम्‍यासह इतर श्‍वसनविकार होत असल्‍याचे समोर आले आहे. धुळ कमी करण्‍यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्‍न व्‍हायला हवेत. तसेच नागरिकांमधील जनजागृती वाढायला हवी.
 
 
 
 
 पुण्‍यात धुळीचे प्रमाण प्रचंड आहे. रस्‍त्‍यावरील धुळीमध्‍ये १० मायक्रोग्रामपेक्षा कमी व्‍यासाचे कण (पीएम – १०) व अडीच मायक्रोग्राम पेक्षा कमी व्‍यासाचे कण (‍पीएम – २.५) असतात. रुग्‍णांना जे फुप्‍फुसविकार, न्यूमोनिया, फुप्‍फुसाचा कर्करोग होतो त्‍या सर्व आजारांना कारणीभूत एक तृतीयांश प्रमाण ही पुण्‍यातील धुळ आहे. त्‍याचा परिणाम केवळ श्‍वसनावरच नाही तर ह्रदयविकाराचा धक्‍का, पक्षाघात, पॅरालिसिस देखील होऊ शकतो. तसेच धुळीचे कण त्‍वचेतून घाम बाहेर पडणाऱ्या छिद्रांमध्‍ये बसल्‍याने त्‍वचा काळवंडल्‍याचे दुष्‍परिणाम दिसून येत आहेत. हे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी रस्‍ता धुळमुक्‍त करणे, तीन पदरी मास्‍क वापरणे गरजेचे आहे.
 
 
 

काय होतो धुळीचा आरोग्‍यावर परिणाम?

‘सीओपीडी’ (काळा दमा), दमा, साधा खोकला, ॲलर्जी, फुप्‍फुसविकार, 
डोळे चुरचुरणे, दुखणे, आग होणे 
दम्‍याचा त्रास असणाऱ्यांना जास्‍त धोका 
ॲलर्जीयुक्‍त सर्दी, खोकल्याचे आजारात वाढ
 
 
 

उपाययोजना 

बांधकामांची धुळीला अटकाव करणे

रस्‍ता धुळमुक्‍त करण्‍यासाठी पदपथ बांधणे, पक्‍के रस्‍ते बांधणे

 बाहेर पडताना कापडाचा तीनपदरी मास्‍क लावणे
Local ad 1