एटीएमवरील व्यवहार झाले महाग, RBI ने असे केले बदल

मुंबई : एटीएम मधुन आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve bank of india) १ ऑगस्टपासून आरबीआयने (RBI) सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. (The interchange fee was increased from Rs 15 to Rs 17) आरबीआयचे हे नवीन नियम लागू झाले असून, आता सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार सत्य आहे.

 

सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्जेक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्जेक्शन विना शुल्क आहेत.त्यावरील ट्रान्जेक्शनवर पैसे आकारण्यात येतात. जून 2019 साली आरबीआयने (RBI) इंडियन बँक असोसिएशनचीच्या (Indian Banks Association) प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

सध्या बॅंकाकडून ग्राहकांना पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येतात. (RBI) त्यामध्ये जर वाढ झाली तर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता या कस्टमर चार्जमध्ये एका रुपयाची वाढ करण्यात आली असून तो 21 रुपये इतका करण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेचा (icici bank) विचार करता या बॅकेंच्या महिन्यातील पहिल्या चार ट्रान्जेक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत तर पाचव्या ट्रान्जेक्शनसाठी तब्बल 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. (A fee of Rs 150 will be charged for the fifth transaction)

 

फायनान्शियल ट्रान्जेक्शन (Financial transactions) म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे होय तर नॉन फायनान्शियल ट्रान्जेक्शन (Non-financial transactions) म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामे करणे असा आहे. (RBI)

Local ad 1