RBI ने आणले डिजिटल करन्सी, जाणुन घेऊया सविस्तर…
RBI : आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल करन्सी बाबत (RBI Launch Digital Rupee) चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. (Reserve Bank of India Launch Digital Rupee)
क्रिप्टोकरन्सीच्या वाढते प्रस्थ आणि जोखीम पाहता सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन (RBI Launch Digital Rupee) आणण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर रिझव् र्ह बँकेने डिजिटल रुपी (RBI Launch Digital Rupee) लाँच करण्याचा आराखडा तयार केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून डिजिटल रुपी वापरली जाईल. त्यानंतर महिनाभर किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट ही सुरू केला जाईल, असे सांगण्यात आले. (Reserve Bank of India Launch Digital Rupee)
RBI डिजिटल रुपी लाँच करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबर रोजी CBDC (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) वर एक कॉन्सेप्ट नोट सादर केली होती. ज्यामध्ये लवकरच डिजिटल रुपी लॉन्च करण्याबाबत उल्लेख केला होता. दरम्यान, सध्या केवळ पायलट लॉन्च केले जात आहे, जे निवडक लोकांसाठी आणले जाईल. (Reserve Bank of India Launch Digital Rupee)