दंलग नगरपरिषदेची : नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नांदेड : एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) जाहिर केलेला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार 13 जून रोजी सकाळी 11 वाजता निर्धारीत ठिकाणावर केला जाणार आहे. (Reservation and lottery program of ten Municipal Councils in Nanded district announced)

 

 

 

कुठे होईल सोडत

देगलूर नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद येथे, मुखेड नगरपरिषदेची सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुखेड येथे, बिलोली नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय बिलोली येथे, कुंडलवाडी नगरपरिषदेची सोडत उपजिल्हाधिकारी रोहयो नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी येथे, धर्माबाद नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय धर्माबाद येथे, उमरी नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथे होणार आहे.

 

 

भोकर नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय भोकर येथे, मुदखेड नगरपरिषदेची सोडत उपजिल्हाधिकारी पुर्नवसन नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुदखेड येथे, हदगाव नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय हदगाव येथे, कंधार नगरपरिषदेची सोडत उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. सर्व संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

 

हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

हिमायतनगर नगरपंचायतीच्‍या सदस्‍य पदांच्‍या आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम नगरपंचायतीच्‍या सदस्‍य पदांच्‍या आरक्षण सोडतीसाठी (सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे सहा.जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांचे अध्‍यक्षतेखाली आरक्षण व सोडत कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. संबंधित नगरपंचायतीच्‍या क्षेत्रातील नागरीकांनी आरक्षण व सोडतीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असेही आवाहन केले आहे. (Reservation and lottery program of ten Municipal Councils in Nanded district announced)

Local ad 1