...

रब्बी हंगामासाठी मानार प्रकल्पातुन (बारूळ) कॅनॉलमध्ये पाणी सोडा : आमदार राजेश पवार

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मानार प्रकल्पातुन (बारूळ) पाण्याची पहिली पाळी 15 नोव्हेंबरपासून कॅनॉलद्वारे सोडावे अशी मागणी नायगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार (Rajesh Pawar, MLA of Naigaon Assembly constituency) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister and Guardian Minister Ashok Chavan) आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर *Collector Dr. Vipin Itankar) यांच्याकडे केली आहे. (Release water into the canal from the Manar project (Barul) for the rabbi season)

 

 

मानार प्रकल्प (बारूळ) यंदा पूर्णपणे भरला असून, रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातुन डावा आणि उजवा अशी दोन कालवे आहेत. यावर सुमारे 24 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. दरम्यान, नायगगांचे आमदार राजेश पवार यांनी कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे. सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. (Release water into the canal from the Manar project (Barul) for the rabbi season)

 

 

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आता पूर्णपणे रब्बी पिकांवर अवलंबून आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झाली आहे. हरभरा पिकास फूलवरा येण्यापूर्वी म्हणजे एक महिन्याच्या आत पाणी पाळी द्यावी लागते. त्यामुळे १५ नोव्हेंबर पासून, मनार प्रकल्पातून पाणी पाळी सोडण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  (Release water into the canal from the Manar project (Barul) for the rabbi season)

Local ad 1