मुंबई : शालेय शिक्षण (School education) विभागांतर्गत बालभारतीच्या (Balbharti) वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या (‘Kishor’ magazine) ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. (Release of Kishore’s ‘Basic Life Skills’ Diwali issue)
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोरचे संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.
मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 52 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते. ‘किशोर’चा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण राहिला आहे. यंदाचा किशोरचा दिवाळी अंक ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या विषयावर आधारलेला आहे.बालवयीन आणि किशोरवयीन मुले अंगभूत बळ, आत्मविश्वास, धाडस यांच्या आधारे संकटांना कशी सामोरी जाऊ शकतील, या प्रश्नाचा वेध कथा, कविता, लेख आणि खेळ अशा माध्यमांतून या अंकात घेण्यात आला आहे. किशोरच्या परंपरेनुसार अंकात अनेक मान्यवरांनी दर्जेदार आणि मनोरंजक लेखन केले आहे.