(Regular vaccination) बलकांचे नियमित लसीकरण राहील्यास तात्काळ करुन घ्या..
पुणे ः कोरोना साथीमुळे बालकांचे नियमीत लसिकरण राहिले आहे. बालकांना घेऊन दवाखाना किंवा लसिकरण केंद्रावर जाण्याविषयी पालकांच्या मनामध्ये भीती असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बाळांना इतर जे लसीकरण नियमित करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात जावून बालकांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त , पुणे व बालरोगतज्ञ टास्क फोर्स यांनी केले आहेत. (Regular vaccination)
लसिकरणाविषयीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनानुसार महामारीच्या कालावधीत देखील नियमीत लसिकरणाची सुविधा शासकीय व महानगरपालिकांच्या लसिकरण केंद्रावर उपलब्ध आहे, तसेच खाजगी बालरोगतज्ञांच्या दवाखान्यांमध्ये देखील सदर सुविधा उपलब्ध आहे. लसिकरण केंद्रावर न जाण्यासाठी पालकांच्या मनातील संकोच , कोविड कालावधीत आरोग्य केंद्रावर जाण्याविषयीची भिती, लॅाकडाऊन, त्यामुळे प्रवासाच्या अडचणी, कोविडची लाट इत्यादी कारणे असू शकतील. (Regular vaccination)
सद्यस्थितीमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. आगामी पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, ज्या बालंकांचे नियमीत लसिकरण करण्याचे राहून गेले आहे, अशा बालकांच्या पालकांनी शासकिय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे, ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे.
आगामी काळामध्ये चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार व शासनाच्या मान्यतेनंतर, लसींच्या उपलब्धतेनुसार बालकांचेही लसिकरण करता येऊ शकेल. तथापि, तोपर्यंतच्या कालावधीत सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे विविध संक्रमित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसिकरण करून घेणे व कोविड प्रतिबंधासाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अनाथाश्रम , वसतिगृहे, अनुरक्षणगृहे, रिमांड होम व कारागृहामध्ये आईसोबत राहणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
विविध कारणांमुळे राहिलेला लसिकरणाचा डोस देण्यासाठी व अधिक माहितीसाठी पालकांनी त्यांच्या कौटुंबिक डॅाक्टरांना, बालरोगतज्ञाकडे, नजिकच्या शासकिय, महानगरपालिकेच्या लसिकरण केंद्रावर संपर्क करावा व आपल्या पाल्यांना सुरक्षित करावे, असे आवाहन सौरभ राव, विभागीय आयुक्त , पुणे व कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात येत आहे.