ऐका हो… अकरावी CET प्रवेश परीक्षेची ऑनलईन नोंदणी बंद
नांदेड : नुकताच दहावीचा मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) द्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही सुविधा तुर्त बंद करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. (Registration for the 11th CET entrance exam is closed due to technical reasons)
सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत करण्यात आले आहे. परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/ प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.20 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 पासून दि. 26 जुलै 2021 अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती. (Registration for the 11th CET entrance exam is closed due to technical reasons)
आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. ही सुविधा पूर्ववत सुरु झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल. तसेच परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. (Registration for the 11th CET entrance exam is closed due to technical reasons)