दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देणे ठरतो देशद्रोहाचा गुन्हा

RBI : दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेला निर्णय हा नोटबंदी नसून, भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्या ‘क्लिन नोट पॉलिसी’नुसार (rbi clean note policy 2023) दोन हजार रुपयांच्या नोटा बदली करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर (Banking expert Vidyadhar Anaskar) यांनी प्रसिद्धपत्राकाद्वारे दिली आहे. (Refusal to accept Rs 2000 notes is a crime of treason)

 

 

दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 नंतरही चलनात वैध ठरणार आहेत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांपुढे रांगा लावण्याची गरज नाही. दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेला निर्णय हा नोटबंदी नसून, भारतीय रिझर्व्ह बँकेने  (Reserve Bank of India) त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्या ‘क्लिन नोट पॉलिसी’नुसार दोन हजार रुपयांच्या नोटा बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार रुपयांच्या नोटेला वाहिली श्रद्धांजली

अशाच प्रकारचा निर्णय आरबीआयने (RBI) यापूर्वी 23 डिसेंबर 2015 रोजी सन 2005 पूर्वीच्या चलनातील नोटा काढून टाकण्याबाबत घेतला होता.  आता दोन हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीनंतरही आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या दोन हजारच्या नोटांची कायदेशीर वैधता अबाधित राहणार आहेत, असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले.  (Refusal to accept Rs 2000 notes is a crime of treason)

 

 

विशेष म्हणजे 30 सप्टेंबरपूर्वी किंवा त्यानंतरही दोन हजारच्या नोटा कोणालाही नाकारता येणार नाहीत. जर कोणी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यास संबंधितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या ‘कलम 124 अ’नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो., असे बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हणटले आहे. (Refusal to accept Rs 2000 notes is a crime of treason)

दोन हजार रुपयांच्या नोटांकरिता आरबीआयने नोटांच्या छपाईच्या वेळेस पाच वर्षांचे आयुर्मान निश्चित केले होते. या नोटांची छपाई सन 2018 नंतर बंद केली होती. त्यामुळे या नोटांची स्वीकृती होत होती. मात्र, या नोटांचे वितरण बँकेत होत नव्हते. त्यामुळे या निर्णयाचा जास्त परिणाम व्यापार क्षेत्रावर होणार नाही, असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले.  (Refusal to accept Rs 2000 notes is a crime of treason)

  • ही केंद्र सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी नसून रिझ्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्या Clean Note Policy नुसार २००০  रुपयांच्या नोटा बदली करणेसंदर्भात घेतलेला निर्णय आहे.
  •  अशाच प्रकारचा निर्णय रिझाव्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी दि.२३ डिसेबर २०१५ रोजीच्या परिपत्रकाद्वारे, सन २००५ पूर्वीच्या चलनातील नोटा काढून टाकणे संदर्भात घेतला होता. त्यावेळी त्या नोटा बदलून घेणेसाठी दि.३० जून २०१६ पर्यैत मुदत दिली होती.
  • याच प्रकारे रु.२००० रुपयांच्या नोटा बदलून घेणेसाठी रिझ्ह बँक ऑफ इंडियाने दि.३० सप्टैबर २०२३ पयैत मुदत दिली आहे. या मुदतीनंरही आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या रु.२०००/- च्या नोटांची कायदेशीर वैधता अबाधित राहणार आहे.
  •   2000 रुपयांच्या नोटा दि.२३ मे २०२३ पासून बँकेत भरणा करावयाचा असा रिझ्ह बँक ऑफ इंडियाचा आदेश नसून त्या नोटा तुम्हाला नेहमीप्रमाणे उ्द्या अथवा दि.२२ तारखेपयैत देखील बँंकेत भरता येतील. दि.२३ मे २०२३ ही तारीख नोटा बदलून मिळणेकरिता आहे. नोटा बदलून देण्यासाठी बँकाना कमी मूल्यांच्या नोटा Currency Chest कडून उपलब्ध करुन घेणेसाठी आणि आपल्या सर्व शाखांमधून योग्य त्या सूचनांद्धारे आवश्यक ती योजना कार्यान्वित करणेसाठी वेळ मिळावा म्हणून दि.२३ मे ही तारीख रिझ़र्ह बँंक ऑफ इंडियाने निश्चित केली आहे.
  •  दि. ३० सप्टैंबर नंतर अथवा त्यापूर्वी देखील पुढ़ील कालावधीसाठी कशा प्रकारे रु.२०००/- च्या नोटा बैंकांनी स्वीकृत कराव्यात या संदर्भांत रिझ् बँक ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित येतील. कारण नोटाबंदीच्या काळात पहिल्या ४३ दिवसांत रिझ्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदी संदर्भात एकूण ६० परिपत्रके प्रसिद्ध केली हा इतिहास सर्वश्रत आहे. रु.२०००/- च्या नोटा स्वीकारतांना त्या नोटांच्या अस्सलपणाविषयी खात्री करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी बँकांवर ठेवली आहे. जर बँकेकडून चूकुन बनावट नोटा स्वीकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी बैंकेवर राहणार असल्याने नोटा मोजनी मशिन्स बरोबरच बनावट नोटा तपासणी मशिन्सही बँकांना जास्ति प्रमाणावर उपलब्ध करुन घ्याव्या लागतील. तसेच संबंधित सेवक वर्गांस डोळ्यात तेल घालून काम पहावे लागणार असल्याने बैंकेवरील ताण निश्चितच वाढणार आहे.
  •   बँंकेमधून रु.२०००  रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणात भरणा होण्याची शक्यता असल्याने  Financial Intelligence Unit च्या नियमानुसार रु.२.०० लाखांवरील रोख जमा रकमांचे व्यवहार बँकांना Cash Transaction Report द्वारे FIU ला कळवावे लागतील. अशा जादा भरणा केलेल्या खात्यांची चोकशी भविष्यात संबंधित तपास यंत्रणांकड्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  •  दि.३० सप्टैबर पूर्वी अथवा दि.३० सप्टेबर २०२३ नंतरही रु.२०००/- च्या नोटा कोणालाही नाकारता येणार नाही. जर कोणी रु.२०००/-च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध ‘भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
  •  रिझ्ह बैंक ऑफ इंडियाच्या Clean Note Policy नुसार रिझर् बँंक ऑफ इंडिया प्रत्येक नोटेचे सरासरी आयुष्यमान (Estimated Life) निश्चित करते. रु.२०००/- च्या नोटांकरिता रिझर्ह बैंक ऑफ इंडियाने नोटाच्या छपाईच्या वेळेसच ५ वर्षाचे आयु्मान निश्चित केले होते. या नोटांची छपाई रिझ्ह बैंक ऑफ इंडियाने २०१८ नंतर बंद केली होती. या नोटांची केवळ स्वीकृती होत होती. परंतु या नोटांचे वितरण बँकेत होत नव्हते. या पाश््वभूमीवर रु.२०००/ – च्या नोटा चलनातून काढून घेण्यात येतील अथवा बंद करण्यात येतील याची खात्री व्यापार व इतर क्षेत्रातील स्वोनाच होती. त्यामूळे या निर्णयाचा जास्त परिणाम व्यापार क्षेत्रावर होणार नाही.
  •  रु.५००/- वरु.१००o/- च्या नोटाबंदी नंतर नवीन नोटांच्या छपाईचा खर्च कमी करणेसाठी रिझ्ह बँंक ऑफ  इंडियाने जास्त मूल्य असलेली रु.२००o/- ची नोट व्यवहारात आणली. या नोटाच्या बदल्यात व्यवहारात वितरण करणेसाठी त्यांच्या एकूण मूल्यांइतक्या इतर नोटांचा कोटा रिझ्ह बँंक ऑफ इंडिया कडे आल्यानंतर  हा निर्णय घेण्यात आल्याने चलनातील रु.२०००/- च्या नोटा बदली करणे संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही, अशी रिझ्ह बैंक ऑफ इंडियाची भूमिका आहे.
  •  प्रसिद्धी माध्यमांमध्ये नमूद केल्यानुसार दि.३० सप्टेंबर २०२३ नंतर रु.२०oo/- ची नोट ही ‘कागज का तुकडा राहणार नसून ती कायदेशीर दृष्टया वेध असणार आहे.  वरील पार्श्वभूमीवर नागरिकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांपुढे रांगा लावण्याची कोणतीही गरज नाही. तसेच दि.३० सप्टेंबर नंतरही रु.२०००/- च्यानोटा चलनामध्ये वैध ठरणार असल्याने बाजारामध्ये भरमसाठ कमीशन देऊन नोटा बदली करुन घेऊ नयेत व स्वतःचे आर्थिक नुकसान करुन घेऊ नये.
Local ad 1