Excise duty। महाराष्ट्रात दारू स्वस्त पण, कोणती ?

Excise duty । मुंबई : मद्यपीना मोल नसतो, विदेशी मद्य आयात केलं जातं, त्यासाठी वाटेल तेव्हढे पैसे खर्च करतात. आता  आयात केलेल्या मद्यावरील करात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. (Reduction in excise duty on Scotch-whiskey)

महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) आयात केल्या जाणाऱ्या मद्यावरील (liquor) उत्पादन शुल्कात कपात (excise duty) केली आहे. स्कॉच-व्हिस्कीवरील (Scotch-whiskey) उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दारूची किंमत इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असून, ते समान करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसेल असा दावाही करण्यात आला आहे.  (Reduction in excise duty on Scotch-whiskey)

स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्च 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Reduction in excise duty on Scotch-whiskey)

महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. (Reduction in excise duty on Scotch-whiskey)

Local ad 1