शाओमी इंडियातर्फे रेडमी 14C 5G लॉन्च

पुणे : शाओमी इंडिया या स्मार्टफोन आणि AIoT ब्रँडने  रेडमी 14C 5G (Redmi 14C 5G) हा फोन जागतिक पातळीवर लाँच करत असल्याचे जाहीर केले. या फोनच्या माध्यमातून बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवकल्पनांची नव्याने व्याख्या करण्यात आली आहे. आधुनिक वैशिष्ट्ये, अखंड परफॉरमन्स आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटीसाठी डिझाइन केलेला रेडमी 14C 5G भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यास डिझाईन करण्यात आला आहे. रेडमी 14C 5G लाँचला रेडमी नोट 14 5G सीरिजच्या उल्लेखनीय यशाची जोड लाभली आहे. (Redmi 14C 5G launched by Xiaomi India)