पुणे : शाओमी इंडिया या स्मार्टफोन आणि AIoT ब्रँडने रेडमी 14C 5G (Redmi 14C 5G) हा फोन जागतिक पातळीवर लाँच करत असल्याचे जाहीर केले. या फोनच्या माध्यमातून बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवकल्पनांची नव्याने व्याख्या करण्यात आली आहे. आधुनिक वैशिष्ट्ये, अखंड परफॉरमन्स आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटीसाठी डिझाइन केलेला रेडमी 14C 5G भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यास डिझाईन करण्यात आला आहे. रेडमी 14C 5G लाँचला रेडमी नोट 14 5G सीरिजच्या उल्लेखनीय यशाची जोड लाभली आहे. (Redmi 14C 5G launched by Xiaomi India)
रेडमी 14C 5Gमध्ये नवकल्पना आणि आकर्षकता अद्वितीय सांगड घालण्यात आली आहे. यात 17.5cm (6.88-इंच) HD+ डॉट ड्रॉप डिस्प्ले आहे, जो 600 निट्स पीक ब्राइटनेससह स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा ब्राउझिंग करताना व्हायब्रंट आणि इमर्सिव्ह दृश्य अनुभव प्रदान करतो. 4nm आर्किटेक्चर वर आधारित स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 5G प्रोसेसरद्वारे समर्थित असलेले हे डिव्हाइस उच्च कार्यक्षमता आणि परफॉरमन्सची खात्री देते. यामध्ये 12GB पर्यंत रॅम (6GB + 6GB विस्तारित) आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग, गेमिंग आणि अॅप नेव्हिगेशन सहजतेने हाताळले जाते. तसेच, मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.
रेडमी 14C 5G मध्ये 50MP AI ड्युअल कॅमेरा सिस्टिम आहे, जी वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकाशस्थितीत व्हायब्रंट आणि बारकाव्यांसह फोटो कॅप्चर करण्याची सुविधा देते. 5160mAh बॅटरीसह, 18W फास्ट चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन दिवसभर अखंड वापरता येण्याची खात्री मिळते. हे डिव्हाइस Android 14 आधारित Xiaomi HyperOS वर चालते. याची युझर इंटरफेस क्लीन आणि सहज समजणारी आहे. या शिवाय, दोन वर्षांची Android अपडेट्स आणि चार वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सची हमी असल्यामुळे दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित होते.
नुकत्याच लाँच झालेल्या रेडमी नोट 14 5G सीरिजमध्ये नवकल्पना, कार्यक्षमता आणि डिझाइन यांची सांगड घालण्यात आली असून मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये उत्कृष्टतेची नव्याने व्याख्या करण्यात आली आहे. रेडमी नोट 14 प्रो 5G सीरिज ह्या सेगमेंटमधील सर्वाधिक टिकाऊ स्मार्टफोन आहे. याला Gorilla® Glass Victus® 2, IP69 सपोर्ट आहे आणि अत्याधुनिक सॉलिड इलेक्ट्रोलाइट बॅटरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक नवीन मानक प्रस्थापित करण्यात आले आहे.
रेडमी 14C 5G 10 जानेवारी 2025 पासून Mi.com, Amazon.in, Flipkart आणि अधिकृत शाओमी रिटेल पार्टनर्सकडे उपलब्ध असणार आहे. याची किंमत 4GB + 64GB व्हेरिअंटसाठी ₹9,999, 4GB + 128GB व्हेरिअंटसाठी ₹10,999 आणि 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी ₹11,999 आहे.
दरम्यान, रेडमी नोट 14 5G सेगमेंटमध्ये सर्वाधिक ब्राइट 120Hz AMOLED डिस्प्ले सह प्रभावी ठरतो, जो कोणत्याही प्रकाशात व्हायब्रंट दृश्य अनुभव प्रदान करतो. यामध्ये 50MP Sony LYT-600 कॅमेरा सेटअप आहे, जो प्रत्येक वेळी सुंदर आणि बारकाव्यांसह शॉट्स कॅप्चर करतो.