आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी उद्या भरती मेळावा

नांदेड  : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी (For trainees who have passed ITI on behalf of Industrial Training Institute) शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालिन प्राचार्य सुभाष सिताराम परघणे यांनी केले आहे. (Recruitment meet for ITI pass candidates tomorrow) 

 

नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या भरती मेळाव्याचे आयोजन सुझूकी मोर्टस, गुजरात प्रा.लि. या कंपनीसाठी एचआरव्हीएस इंडिया प्रा.ली. मार्फत करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता, वेतन व आवश्यक व्यवसाय याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

 

Newspaper । खाद्यपदार्थ पॅकीगसाठी वृत्तपत्राचा वापर केल्यास होणार कारवाई

अर्हता दहावी उत्तीर्ण किमान 50 टक्के गुणासहित व आयटीआय उत्तीर्ण कमीत कमी 60 टक्के गुणासहित पास आऊट वर्ष 2015 ते 2020, वय 18 ते 23 वर्ष, वेतन 20 हजार 100 रुपये इ. व्यवसाय – वेल्डर, पेन्टर, फिटर, मोटार मॅकॅनिक, डिझेल मॅकॅनिक, इलेक्ट्रीशियन, टॅक्ट्रर मॅकॅनिक, टूल ॲन्ड डायमेकर, टर्नर, मसिनिस्ट, सीओई ॲटोमोबाइल. (Welder, Painter, Fitter, Motor Mechanic, Diesel Mechanic, Electrician, Tractor Mechanic, Tool & Diemaker, Turner, Mechanist, COE Automobile) तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडाटा, आधारकार्ड, फोटो, एस.एस.सी. व आय. टी.आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र (मुळ प्रमाणपत्र व दोन छायांकित प्रती ) सोबत आणाव्यात, असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने कळविले आहे. (Recruitment meet for ITI pass candidates tomorrow)
Local ad 1