जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा, कोणाला मिळणार संधी जाणून घ्या..

मुंबई : सरकारी नोकरीच्या (Government job opportunities) संधीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील  (Zilla Parishad) आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक (Health workers, nurses, laboratory technicians, drug manufacturers and health supervisors) या 5 संवर्गातील एकूण 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत  आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून, यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत (District Selection Committee) करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी दिली. (Clear the way for recruitment in the health department of Zilla Parishad)

 

 

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत. (Clear the way for recruitment in the health department of Zilla Parishad)

 

 

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96 पदे, आरोग्य सेवक (पुरूष) याची 3 हजार 184 पदे आणि आरोग्य सेविकांची 6 हजार 476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण 4 लाख 2 हजार 12 अर्ज प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. (Clear the way for recruitment in the health department of Zilla Parishad)

 

आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Local ad 1