पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Rural) १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध (Manifesto published) करण्यात आला आहे.(Ration shop licenses will be available in Pune rural villages) परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर (District Supply Officer Dr. Seema Holkar) यांनी केले आहे. (Ration shop licenses will be available in Pune rural villages)
बारामती आणि दौंड तालुक्यातील प्रत्येकी ३, मावळ – ३६, खेड- १०, आंबेगाव – १९, इंदापूर – ६, वेल्हे- ७०, जुन्नर -१६, पुरंदर- १८, हवेली – २२, भोर आणि शिरुर प्रत्येकी ९ आणि मुळशी तालुक्यातील २० (3 each from Baramati and Daund talukas, Maval – 36, Khed – 10, Ambegaon – 19, Indapur – 6, Velhe – 70, Junnar -16, Purandar – 18, Haveli – 22, Bhor and Shirur 9 each and Mulshi talukas 20 each.)अशा जिल्ह्यातील एकूण २४१ गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे.
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसील कार्यालयाच्या (Tehsildar Office) पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.