Ration Card major update : शिधापत्रिका काढण्यासाठी किंवा नावात बदल करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परंतु आता यापुढे ही कसरत थांबणार आहे. आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि राज्य शासनाच्या योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाईन ई शिधापत्रिका विना शुल्क मिळणार आहे. महा ई सेवा वकेद्र, आपले सरकार व सीएससी सेंटर मधुन ई-शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन (ration card online maharashtra) अर्ज भ१रताना पैशाची मागणी करण्यात आल्यास संबंधित तहसिलदार यांचेकडे तक्रार दाखल करावी. (Ration Card major update ; Now you can get Roshan card free and online)
Related Posts
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह सचिव ता.मा.कोळेकर यांनी बुधवारी शासन निर्णय जारी केला आहे. अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्जदारास https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावरुन सदर ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल. या आदेशाची अंमलबजावणी 16 मे 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. तरी या सुविधेचा 100 टक्के वापर करावा. तसेच यापुढे जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल, असे आवाहन पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.
आर्थिक लूट थांबली, मोफत मिळणार शिधापत्रिका
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-शिधापत्रिका सुविधा सर्व सामान्य नागरिकांची आथिक लुट थांबविण्यासाठी निःशुल्क उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी शासननिर्णय घेतलेला आहे. सरकारी काम व सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठी तहसिल कार्यालयाचे / परिमंडळकार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी पिळवणुक करण्यात येत होती. अनेकांनी तर तहसिल/परिमंडळ कार्यालयात रेशनकार्डासाठी दुकान थाटली होतीत्यात एजंटचा धुमाकूळ चालू होता. रेशन कार्डसाठी एजंट दोन – तीन हजार रुपये सर्वसामान्यांकडुन घेत होते व वारंवार चकरा मारायला लावत होते. आता या सर्वकचाट्यातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका शासनाने केलेली आहे. आता दलालांचा धंदा बंद होणार असून सामान्य नागरिकास घरपोच कसलाही खर्च न करता फ्रि मध्ये रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे.
कोणाला होणार याचा लाभ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुट्ंब योजना (PHH) व राज्य योजनेच्या (APL शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (NPH), APL शेतकरी व्यतिरिक्त व APL शुभ्) शिधापत्रिकाधारक अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेव्दारे ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जदार यांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपध्दतीनुसार तपासणी करुन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जदारास RCMS चे संकेतस्थळावरुन Public Login मधून सदर ई-धापत्रिका डाऊनलोड करता येईल. (Ration Card major update ; Now you can get Roshan card free and online)