(Konkan floods) कोकणात येण्यासाठी तुम्हाला मोदींची परवानगी घ्यावी लागते का? : केंद्रीय मंत्री राणे झाले ट्रोल (troll)

मुंबई : कोकण आणि राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीने थैमान घातले असून, विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री पुरपरिस्थिती (Konkan floods) पहाणी करत आहेत.

 

(Konkan floods) कोकणचे भूमिपुत्र आसलेले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister narendra modi) यांच्या मंत्री मंडळात वर्णी लागलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुर परस्थिती आणि दरड कोसळून झालेल्या आपत्तीची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर (Devendra fadnavis and parib darekar) यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने जात असल्याची माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली होती. यातील “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमती”ने  हेे वाक्य कोकणातील आणि राज्यातील नेटकऱ्यांना रुचलेले नाही. त्यावरुन राणे यांना आता जोरदार ट्रोल करुन सोशल मिडियावर प्रश्न विचारले जात आहेत. (Union Minister Narayan Rane became a troll)

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी (Konkan floods) फेसबुक व ट्विटर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्यातील तळीये गावाची आणि रत्नागिरी चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत नारायण राणे यांना जोरदार ट्रोल केले आहे. हाच का कोकणचा स्वाभिमान असे म्हणत नेटकऱ्यांनी नारायण राणेंना चांगलेच फैलावर घेतले आहे. (Union Minister Narayan Rane became a troll)

 

konkan floods
konkan floods

Konkan floods राणे, फडणवीस व दरेकरांचा हवाई पाहणी दौरा

राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. कोकणात याचा मोठा फटका बसला आहे. महापुर व दरडी कोसळून मोठी जीवित व वित्त हानी झाली. (Konkan floods) पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सत्ताधारी व विरोधीपक्ष धावत आहेत. रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोकण भागाचा हवाई दौरा करत पुरामुळे जनजीवन विस्कळित झालेल्या चिपळूण, महाड, खेड तालुक्याची पाहणी केली. (Union Minister Narayan Rane became a troll)

 

 

दरम्यान कोकणच्या दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड मधल्या तळीये गावाला भेट दिली. (Konkan floods) या ठिकाणी दरड कोसळून अनेकांचा बळी गेला होता. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करण्याचे आवाहन राणे यांनी केले. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. बचाव कार्याचे काम गतीने सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्ध्वस्त झालेल्या घरांचे पूर्णपणे पुनर्वसन होईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क्या घरांचे आयोजन केले जाईल. गावाला जेवढी जमेल तेवढी मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून केली जाईल, फक्त गेलेले प्राण आम्ही परत करू शकत नाही. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्यांना सहकार्य करावे. गावाला संपूर्ण आधार देण्यात येईल. तात्काळ आणि कायमचं पुनर्वसन गावातच करुन दिले जाईल असे त्यांनी म्हंटले. (Union Minister Narayan Rane became a troll)

 

 

 

राणे पुढे म्हणाले संपूर्ण नुकसानीची पाहणी करून याचा अहवाल (Konkan floods) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी सादर करणार आहे. पक्की घरे आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणून एक कायमची एनडीआरएफ ची टीम कोकणात ठेवण्यात यावी अशी मागणी करेल असे राणे शेवटी म्हणाले. (Union Minister Narayan Rane became a troll)

 

 

Local ad 1