...

(rajeev satav) राजीव सातव आपले वाटायचे…

कोरोना महामारीत अनेक आई-वडिलांनी मुलगा गमावला…मुलांनी वडील..पत्नीने पती.. बहीन आणि भावाने भाऊ गमावला…कोणी कोणाची समजूत काढावी, असे प्रसंग अनेक घडले. एवढच नाही, तर शेवटचे अंत्यदर्शनही घडले नाहीत. घरातील ज्येष्ठापासून ते कर्तबगार असलेल्या व्यक्तीला कोरोनामुळे मृत्यूने गाठले. राजकीय व्यक्तींचे जीवन म्हणजे सार्वजनिक असते. त्यांना वेळप्रसंगी लोकांच्या मदतीसाठी पुढे यावं लागतं. त्यातूनच त्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. अनेकजण बरेही झाले. मागील महिन्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाचे कँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले. आज राज्यसभेचे खासदार राजीव सातव गेल्याची बातमी कळली आणि काळजात धस्स झालं… (rajeev satav)

      राजीव सातव यांची 22 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना पुण्यातूल जांहगीर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालवतच होती, त्यामुळे 28 एपिल रोजी त्यांना व्हेंटिलेटवर ठेवावे लागले. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली. 10 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. ही बातमी वाचून बरं वाटलं. गेली काही दिवस लालगेली चिंता काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, नियतीला हे मान्य नव्हतं. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची तब्येत सुधारेल, अशी अपेक्षा असतानाच त्यांना सायटोमेगॅलो या नवीन विषाणूने गाठलं. त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवाव लागलं. ही बातमी वाचल्यानंतर पुन्हा काळजात धस्स झालं. काय हे, एका विषाणुवर मात करुन बाहेर येत आल्यानंतर दुसऱ्या विषाणुने गाठलं. शनिवारी काँग्रेस नेत्यांनी रुग्णायाला भेट देत डॉक्टरांशी चर्चा केली. सातव यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून  असून, ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेवटी रविवारी पहाटे त्यांना मृत्यूने गाठलं. सातव यांची कधी भेट झाली नाही. भेटण्याचा कधी योगही आला नाही. मात्र, चेहऱ्यावरील स्मित हस्य, कधीच कोणाला सभ्यता ओलांडून बोलणे नाही, कधीच कोणावर व्यैक्तिक टिका-टिपणी केली नाही. ते प्रत्येकाला आपले वाटायचे. मलाही या व्यक्तीबदल आपलेपणा वाटायचा, ते येथे शब्दात मांडता येणार नाही. श्रद्धांजली तर कशी व्हायची… राजीवजी आपला स्मित हस्य असलेला चेहरा नेहमी आठवणीत राहाल…. (rajeev satav)

Local ad 1