(Rain of money) पैशांचा पाऊस अन् 52 लाखांना गंडा

पुणे : दामदुप्पट देण्याच्या नवाखाली पैसे गेळा करणाऱ्या अनेक कपंन्या पाहिल्या आहेत. त्यातून अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर आले. पण तुम्ही पैशांचा पाऊस पाडून दिलं जातं, असं कधी एकले का ?, नाही ना.. जालन्यातील एका मांत्रिकाने धायरीतील एका सावकाराला पैशांचा पाऊस पाडुन देतो म्हणून थोडे-थोडके नाही. तर तब्बल 52 लाख रुपयांना गंडवलं आहे. या मांत्रिकाला पुणे पोलि्सांनी जालन्यातून अटक केली.  Rain of money and Rs 52 lakh

किसन आसाराम पवार (वय ४१, रा. हिवरखेड, ता़ मंठा, जि़ जालना) असे अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी, धायरीतील  एका ४० वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पैसे दिल्यानंतर देखील पैशांचा पाऊस काही पडला नाही. मात्र,  मांत्रिकाने पुन्हा पैशांची मागणी केली. Rain of money and Rs 52 lakh

फिर्यादीला त्यांच्या एका मित्राने जालन्यातील मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याची माहती दिली. त्यात फिर्यादीची उत्सुकता वाढत गेली. २०१६ च्या दरम्यान फिर्यादीने मांत्रिकाची  भेट घेतली. त्यावेळी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काय करावे लागेल, असे विचारले  त्यासाठी आपल्याला छोटीशी पुजा करावी लागेल आणि पुजेसाठी काही पैसे पुजेत ठेवावे लागतील, असे मांत्रिकाने सांगितले. Rain of money and Rs 52 lakh


 फिर्यादी याने त्याला वेळोवेळी थोडे -थोडे करुन तब्बल ५२ लाख १ हजार रुपये दिले. तरी पैशांचा पाऊस पडला नाही . तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देणे बंद केले. नुकतेच  मांत्रिक पवार याने तुमचे काम झाले आहे. परंतु, एक शेवटचा विधी राहिला असून, तो तुम्हाला करावा लागेल, असे सांगितले. पंरतु त्यासाठी पुन्हा पैसे लागतील. आपली फसवणूक झाल्याची बाब फिर्यादीच्या लाक्षत आली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी किसन पवार याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो जालना जिल्ह्यातील गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक बनावट ग्राहक तयार केले. त्याबाबत खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकून पवार व त्याने तेथील सर्व वापरलेले साहित्य ताब्यात घेतले. Rain of money and Rs 52 lakh


 पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक  आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक  निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, अंमलदार दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी ही कामगिरी केली. Rain of money and Rs 52 lakh

Local ad 1