रायगड जिल्ह्यात दरड कोसळली ; 35 जणांचे मृतदेह काढले बाहेर (Raigad landslides)
रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळई गावात (Talai Village) 35 घरांवर दरड कोसळली असून यात 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Raigad landslides ; 35 Dead bodies were removed on)
गेल्या दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर भागात होत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार माजवाला असून, गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दरड दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.तर दुसरकडे जोरदार पाऊस होत असल्याने मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. (Raigad landslides ; 35 Dead bodies were removed on)
एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झाले आहे. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. (Raigad landslides; Dead bodies were removed on)