...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल  ; देगलूर मध्ये झाला भव्य स्वागत

नांदेड : राहुल गांधींच्या मार्गदर्शनात निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाले आहे. (Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra) महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर देगलूर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते जमले आहे. 

 

 

 

तेलंगणामध्ये एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हाती मशाली दिसल्या होत्या. पण काँग्रेसची आजची मशाल यात्रा ही भव्य अशीच होती. स्वत: राहुल गांधी यांनी हाती मशाल घेतली होती. त्यांच्यासोबत हजारो युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांच्या हाती मशालीघेऊन सहभागी झाले आहेत. (Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra)

 

 

 

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. (Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra)

 

 

 

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्या रजनी पाटील, सुशिलकुमार शिंदे, जयराम रमेश, एच के पाटील, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान, भाई जगताप, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेते सामिल झाले आहेत.(Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra)

Local ad 1