Rahul Gandhi । राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश  

Rahul Gandhi ordered to appear in Pune Sessions Court : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेले वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भोवण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. कलम 204 अन्वये हे आदेश देण्यात आले आहेत. (Rahul Gandhi ordered to appear in Pune Sessions Court)

 

 

 

राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयाच्या या आदेशानंतर स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात हे पहावे लागेल.

 

 

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

Local ad 1