Live Reporting । किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांचा राडा
किरीट सोमय्यांच्या मनगटाला मार लागला आहे. घाबरल्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. परंतु, काही वेळाना रक्तदाब पूर्वपदावर आला आहे. त्यांना कुठेही फ्रॅक्चर झालेले नाही. मुक्का मार लागला आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्यांना संचेती रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
– डॉ.पराग संचेती, संचेती हॉस्पिटल, पुणे.
तक्ररारीनंतर सोमय्या म्हणाले…
लाइफ लाइन मॅनेजमेंट सर्विसेसचे मालक सुजीत पाटकर आणि पीएमआरडीएचे मुख्याधिकारी यांना तत्काळ अटक करण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अजित पवार यांना पुरावे पाहिजे होते, त्यासाठी पुरावे आणले आहेत. पवार यांच्या निगराणीत हे कंत्राट दिले गेले आहे.त्यामुळे त्यांनीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे. शिवसेनेच्या माफियांसाठी पैशांची उधळपट्टी सुरू असून, ते लोकांचे जीव वाचवू शकले नाहीत, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महापालिकेत शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना उपचारासाठी शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. (Live Reporting । Rada of Kirit Somaiya Somaiya and Shiv Sainiks)