कहाणी जशी सज्जन माणसांची असते तशी ती दुर्जन माणसांची ही असते. काही दुर्देवी घटनांचे वार झेलत जी दुर्जन माणसांची कहाणी बनते ती लक्षवेधी ठरते. प्रत्येक माणसाच्या आत एक ‘रानटी’ जनावर दडलेला असतो. आलेल्या परिस्थितीमुळे ‘रानटी’ झालेल्या विष्णूची आणि त्याच्या जिगरबाज अंदाजाची कथा सांगणारा ‘रानटी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोयं पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अॅक्शनपट असणार आहे. (Raanti movie produced by Puneet Balan Studios)
दमदार व्यक्तिरेखा,अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात. भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश करण्यासाठी आलेल्या विष्णूचा शत्रूला भयभीत करणारा आवेश धडकी भरवणारा आहे. पिळदार शरीरयष्टी, नायक आणि खलनायकातलं वैर, शत्रूला भयभीत करणारा नायकाचा आवेश, या सगळ्यामुळे अनेक अॅक्शन हिरो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सगळ्या नामावलीत ‘रानटी’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठीला सुद्धा एक जबरदस्त ‘अँग्री यंग मॅन’ अॅक्शन हिरो अभिनेता शरद केळकरच्या रूपाने मिळाला आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं ‘अँग्री यंग मॅन’ रूपच समोर आले आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य, त्याची मांडणी हे सगळं ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्यात दिग्दर्शक समित कक्कड यशस्वी झाले असून निर्माते पुनीत बालन यांची उत्तम साथ त्यांना लाभली आहे.
स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे.अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर,नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे,छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे,माधव देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये,सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे. सुजीत कुमार यांचे नृत्यदिग्दर्शन, वेषभूषा सचिन लोवलेकर तर रंगभूषा संतोष गायके यांची आहे. गीते मंगेश कांगणे यांची आहेत. साऊंड डिझाईन मयूर मोचेमाडकर तर कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे.कार्यकारी निर्माते मिलिंद शिंगटे आहेत. २२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.